2017 वर्षा च्या समाप्तीला बेळगाव शहर परिसर
गारठला असून तापमान 10.3 डिग्री असा पारा घसरला आहे.
शहरात कमालीचा गारठा आहे त्यामुळे आगामी दोन दिवसात आणखी हुडहुड वाढण्याची शक्यता आहे.शुक्रवारी पहाटे पासून भरपूर थंड वाढली होती शुक्रवार दिवसभरात शहर परिसरात कमाल 28.3डिग्री तर किमान 10.3 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजा नुसार कमीतकमी तापमान 10 डिग्री तर जास्तीत जास्त 28 डिग्री असू शकतं.या वर्षाच्या शेवटी आणि नवीन सुरुवातीला बेळगाव शहरात थंड असणार हे नक्की आहे
बेळगाव शहराचं डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान 4 डिसेंबर 1970 रोजी 7.7डिग्री नोंद आहे तर 2016 या वर्षात 10 डिसेंबर 2016 रोजी 8.9डिग्री नोंद होती.