बेळगावातील अनेक शासकीय कार्यलयात अधिकारी ,कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात त्यामुळे कामानिमित्त गेलेल्या सर्वसामान्य जनतेला त्यांची वाट बघत तासनतास तिष्ठत बसावे लागते.जरुरीचे काम असले तरी कर्मचारी भेटत नसल्यामुळे वेळ वाया जाऊन नाहक मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे.
असाच प्रकार बेळगाव कोर्ट कंपाऊंड येथील प्रांताधिकारी कार्यलयातून वरचे वर पहावयास मिळतो दुपारी शासकीय जेवणाची वेळ 1वाजून 30 मिनिटे ते 2 वाजून 30 पर्यंत आहे पण इथल्या कार्यलयातील कर्मचारी केव्हाही येतात आणि केव्हाही जातात.
बाहेर अन्य शासकीय कामासाठी नाही जात तर चक्क ए सी ऑफिसच्या बाजूला अराम विश्रांती घेत असतात,सामान्य माणूस एखाद्या आपल्या फाईलची विचारपूस करण्यासाठी आला तर त्याला अधिकाऱ्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते हुक्केरीहुन आलेल्या बाहुबली नामक व्यक्तीला याचा चांगलाच अनुभव आला.बाहुबली हे आपल्या कामानिमित्त दुपारी दीड वाजल्यापासून साडेतीन पर्यंत वाट बघत बसले होते. याला जबाबदार कोण ? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवून जनतेची कामे त्वरित करून देण्याचा आदेश बजावणे आवश्यक आहे.