शेतातील रब्बी पेरणी होऊन उगवण सुरु झाली तसेच खरीपातील भात मळण्या करुन शेतकऱ्यांना आता थोडी उसंत मिळते तो काळ भक्तिमधे रमवावा आणी पुढील काम सुरळीत होण्यासाठी नवचैतन्य याव या उद्देशांने खास करुन बेळगाव तसेच परिसरातील शेतकरी तसेच जनता सौंदत्ती यल्लम्मा यात्रेला जातात .
ज्यांची बैलगाडी आहे ते बैलगाडीने तसेच हौसेने ट्रॅक्टरही घेऊन जातात.हा प्रवास साधारण आठ ते दहा दिवसाचा असतो.तिथे मोठी यात्रा भरते.त्यासाठी बेळगाव भागातील जनता मोठ्या प्रमाणात त्या यात्रेला जाते.त्यासाठी आज होसूर मधील दोन बैलगाड्या तसेच एक ट्रॅक्टर रवाना झाला.व येती पौर्णिमा मंगळवारी आहे ती संपन्न करुन भक्तगण आपापल्या घरी परत येतात.
अशी ही श्री रेणूका यल्लम्मा यात्रा मोठ्या भक्तिभावाने लाखो जनतेच्या उपस्थितीत साजरी होते.