अलीकडेच अनगोळमधील तलावाचं सुशोभिकरण तसेच परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून काम सूरु आहे त्याबद्दल विरोध नाही पण त्यातील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनगोळ शिवारातील नाला येळ्ळूर रस्त्यापर्यंत खूदाई व रुंद करुन त्यातून पाणी सोडले पण ते पाणी बळ्ळारी नाल्यात भरपूर गाळ भरल्याने अडून रब्बी पेरणी केलेल्या शेतीत जाऊन तुडूंब भरल्याने आत्ताच उगवलेली पिके पाण्यात गेल्याची स्थिती आहे. येळ्ळूर रस्ता बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या शेतीत घुसून शेतकऱ्यांची बियाणं वाया गेल्याने अल्पभूधारक शेतकरी गर्भगळीत झाले आहेत तर भात मळण्या कांहीनी आधीच केल्या होत्या म्हणून बचावले.
अन्यथा गंज्यातून पाणी घूसून ते नुकसान वेगळेच झाले असते. एकरी ४० किलो मसूर व इतर धान्य पेरणीसाठी ८००० हजार रु खर्च येतो.जर गेल्यावर्षी मसूरचा भाव २३० रु होता यावर्षी १२५ रु आहे म्हणून बचावला.
असो पण हे तलाव सुशोभिकरण करतानां पाणी कुठून जाणार आहे बळ्ळारीची अवस्था काय आणी पाणी सोडल्यावर शेतकऱ्यांच नुकसान तर होणार नाही नां ? व इतर बाबिंचा साधक बाथक विचार करुन तरी तलावाच काम हाती घेतलं असतं तर बर झालं असतं.असे शेतकरी सांगत आहेत.
पण कोणताही विचार न करता अनगोळ शिवारातील शेतकरी तसेच शहापूर शिवारातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा विचार तलाव सुशोभिकरण करण्यात पुढाकार घेतलेले लोकप्रतिनिधी करणार आहेत कि त्यांना कंगाल करण्याचा विडाच उचललाय ? असे विचारत शेतकरी संतप्त झालेत.
Trending Now