belgaum

सोमवारी रात्री उशिरा खडक गल्ली सह संवेदनशील परिसरात दोन गटात झालेल्या दगडफेक जाळपोळ प्रकरणात आणखी १३ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून खडे बाजार पोलिसांनी चौघा जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.police path sanchalan bgmखडे बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन शिंदे १८ तुषार शिंदे १९ रा भडकल गल्ली,संजय पाटील ३० ,राम गुलबकर ३४ रा खडक गल्ली या चौघांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे तर खालील सुमित गायकवाड,शुभम शंकर कंग्राळकर,गणपती नंद्गडकर,संजय जाधव,शिवाजी जाधव ,शुभदा जाधव,स्वरांजली जाधव,प्रसाद इंद्रकुमार शिरोळकर,शुभम गुलबकर यांच्या वर  गुन्हे नोदन करण्यात आले आहेत.पोलिसांनी आय पी सी कलम १४३,१४७, १४८, १५३अ, ५०४ , ५०६ अन्वये दोन धर्मियात तेढ निर्माण करणे,सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणे गटाने मारामारी करणे असे गुन्हे नोंदवले आहेत.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.