काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य, योजना आयोगाचे उपाध्यक्ष सी एम इब्राहिम यांच्या बेळगाव सस्पेन्स भेटीची सध्या जोरात चर्चा आहे.
ते गेल्या सोमवारी बेळगाव ला सस्पेन्स भेट देऊन गेले आहेत.सोमवारी दुपारी बेळगाव ला आले किल्ला येथील शाह बदरोद्दीन दर्ग्यात दर्शन घेतलं आणि गुप्त बैठक घेऊन निघून गेले.
इब्राहिम जे डी एस नेत्यांच्या संपर्कात आहेत असं म्हणतात. या सस्पेन्स दौऱ्याने बेळगाव काँग्रेस मधल्या अंतर्गत घडामोडी वाढल्यात हे नक्की झालंय.
विशेष म्हणजे या भेटीची स्थानिक काँग्रेस नेत्यांना कोणतीच कल्पना नाही. काहींच्या मते बेळगावातील एक नेत्या विरोधात हाय कमांड कडे भरपूर तक्रारी गेलेत त्याची शहानिशा करण्यासाठी येऊन गुप्त बैठक घेऊन गेले आहेत. एका माजी आमदारांचा पत्ता कट करायला माहिती घ्यायला आले होते की काय असाही संशय काहीजण व्यक्त करीत आहेत.
पक्षातील काही नाराज अल्प्ससंख्याक नेत्यांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे.