सर्प हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे हे पटवण्यासाठी कार्य करणाऱ्या सर्प मित्र आनंद चिट्टी यांच्या कार्यास अखेर यश मिळताना दिसत आहे.आपल्याच घरी पकडलेला उंदीर खाणारा बिनविषारी सर्प एका शेतकऱ्यांने आपल्या शेतात सोडला आहे. खानापूर तलुक्यातील नायकोल तीओली वाडा येथील नारायण अंधारे अस या शेतकऱ्याच नाव आहे.
नारायण यांच्या घरी सर्प मित्र आनंद चिट्टी यांनी आपल्या कारकिर्दीतील 13999 वा साप त्यांनी पकडला असून त्यांच्या जनजागृतीची परावृत्त होत शेतकऱ्याने आपल्या शेतात साप सोडण्याच धाडस दाखवलं आहे.धामण हा बिन विषारी जातीचा सर्प असून मोठ्या प्रमाणात उंदीर खाणारा सर्प म्हणून ओळखला जातो याची जाणीव चिट्टी यांनी सदर शेतकऱ्यास दिली होती अनेक व्याख्यानातून चिट्टी सर्प माहिती देत जनजागृती करत असतात अंधारे या शेतकऱ्यांन आपल्या शेतात सर्प सोडणे म्हणजे आनंद चिट्टी इम्पॅक्ट होय…