छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा,जशा अफ़जलखान वध,शाहिस्तेखानची बोटे तोडणे ,या आपण नेहमी ऐकतोच पण शिवाजी महाराजांच्या गुणवत्तेबद्दल आपण कमी बोलतो.तुमच्या शाळेच्या संस्थेप्रमाणेच शिवाजीसुध्दा जनकल्याणासाठीच झटत होते .सगळी रयत,जनता माझी आहे अशी त्यांची भावना होती,आजच्या राजकीय नेत्यांसारखे शिवाजी जनतेच्या दूर कधीच नव्हते.अशा शब्दात सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडीत यांनी शिवाजी महाराजांचं चरीत्र मांडलं.
संत मीरा मराठी शाळा गणेशपूर मधील विद्यार्थ्यांनी मातीच्या किल्यांनी बनविलेल्या आकर्षक अशा शिवस्रूष्टीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.प्रसिध्द उद्योगपती मोहनराव ईजारे यांनी ईतर मान्यवरांच्या उपस्थित शिवस्रुष्टीच यथोचित उद्घाटन केलं.जनकल्याण ट्रस्टचे संचालक,कार्यकर्ते, शिक्षकवर्ग,पालक, बेळगावातील विभिन्न संस्थांचे सदस्य ,विमल फौंडेशनचे अध्यक्ष श किरण जाधव यावेळी उपस्थित होते.फगवे फेटेधारी मुले आणि नाकात साजरी नथ घालून नऊवारी लुगड्यातला मराठी वेष सर्वांच लक्ष वेधून घेत होता.
प्रसाद पंडीतांनी आपल्या भाषणात शिवचरीत्र जीवंत उभं करुन उपस्थितांना भारावून सोडलं. ईजारेनी बेळगाव जवळ असलेल्या तानाजीपुत्र रायबाच्या पारगडाची माहीती दिली व त्याला जरूर भेट देण्याची सूचना केली. रामनाथ नाईकनी परीचय व स्वागत केले तर मुख्याध्यापकानी आभार मानले.विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांनी सुरुवात झाली.सुंदर सुत्रसंचालनानी कार्यक्रमाची रंगत वाढली.जय भवानी जय शिवाजी च्या उस्फूर्त गजरांनी वातावरण शिवमय झालं होतं.किल्यांची उभारणी देखणी व प्रेरणादायी होती.गेली दोन वर्षे शाळेतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे ज्यांत शिक्षक विद्यार्थी व पालकही सहयोग देत आहेत.असा उपक्रम घेणारी बेळगावातील ही एकमेव शाळा असावी .