अनगोळ गावातील सुप्रसिद्ध काळा तलावाच्या सुशोभीकरणाला अखेर सुरवात करण्यात आलीआहे . तलावाच्या बांधावरील वाढलेले गवत तलावातील जलपर्णीनी अच्छादलेले बांधावरील वाढलेले गवत काढण्याचा सुरुवात करण्यात आली. बुधवारी सकाळी नगरसेवक गुंजटकर यांनी कंत्राटदारास सुशोभिकरण करण्याच्या सूचना दिल्या.
अनगोळ गावातील हा काळा तलाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांना वरदान ठरत होता पण गेली दहा वर्षा पुर्वी पासुन या तलावात विषारी जलपर्णीनी अच्छादलेला आहे, आणि लोहार गल्लीतील मागील बाजूस असलेल्या गटारी तीळ घाण ड्रेनेज चे पाणी, तसेच मारूती गल्लीच्या पिंपळ कट्ट्याला लागुन असलेल्या गटारीतुन संपूर्ण भाग्य नगर टिळकवाडी,अनगोळ गावातील गटारी चे पाणी फार मोठ्या प्रमाणात या तलावात सोडण्यात आले आहे.
गेली कित्येक वर्षे या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा करण्यात येत होता अखेर नगरसेवक विनायक गुंजटकर यानी पाठपुरावा केला आणि जवळपास एक कोटी रुपये या सुशोभीकरणाला मंजुरी मिळवली. गुंजटकर आणि कंत्राटदार यानी तलावास भेट देऊन तलावाच्या बांधावरील ठेवलेले गवताच्या गंज्या काढून घेण्याच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या आहेत.
बातमी सौजन्य – भावेश बिर्जे अनगोळ