क्षय हा एक गंभीर रोग आहे. ट्ुबर्कल बॅसिलस या बॅक्टेरिया (सूक्ष्मजंतू) मुळे हा रोग होतो. नाक, तोंड आणि स्वरयंत्र यामार्फत हे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतात. फुफ्फुसात जाऊन आपले बस्तान बसवितात. तेथे त्यांची हजारोंच्या संख्येने वाढ होते. हे सूक्ष्मजंतू सूक्ष्मगाठी किंवा गुठळ्या तयार करतात.
कारणे आणि लक्षणे- शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर हा रोग सहजपणे होऊ शकतो. चुकीचा आणि अपुरा आहार हे शरीर निरोगी न राहण्याचे महत्वाचे कारण आहे. तसेच राहण्याची जागा कोंदट व बंदिस्त असेल, अस्वच्छ असेल तर क्षय होण्याची शक्यता खूप वाढते. निद्रानाश, अशुध्द हवा, बैठे काम, अति श्रम, गारठ्यात वावर, तंबाखू खाण्याची व मद्यपानाची सवय या कारणांनी क्षय होण्यास पुरेपूर वाव मिळतो. चुकीच्या राहणीमानामुळे आणि सवयीमुळे विविध प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळते. क्षयरोगाच्या जंतूंचा प्रसारही असाच होतो. व्यक्तीला जर एड्स झाला असेल तर त्याची प्रतिकारशक्ती मुळातच कमी झालेली असते. अशा व्यक्तींना क्षय होण्याचा धोका जास्त असतो. त्या उलट रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर क्षयाचे जंतू शरीरात जाऊनही शरीरावर ताबा मिळवू शकत नाहीत.’क्षय’ रोग शरीराच्या कोणत्याही भागाला होऊ शकतो. सर्वसाधारणपणे क्षयाची बाधा फुफ्फुसे, आतडी, हाडे, विविध ग्रंथी, गर्भाशय यांना होते. पलमोनरी ट्यूबरक्युलोसिस किंवा फुफ्फुसांचा क्षयरोग हा सर्वात जास्त प्रमाणात होणारा क्षय आहे. रूग्ण पांढुरका दिसू लागतो. वजनही घटते. रूग्णाला संध्याकाळी ताप येतो. खांद्यामध्ये वेदना होतात. अपचन होाते, छाताीत दुखते, थुंकीतून रक्तपडते. आतडी हाडे, ग्रंथी, गर्भाशयाच्या बाबतीत क्षयाची अवयवानुसार लक्षणे जाणवतात.
थुंकी, रक्त, लघवी माँटोटेस्ट एमआरआय यांच्या चाचण्यांव्दारे निदान करता येते.
उपचार- मॉडर्न मेडिसिनमध्ये क्षयावर चार प्रकारची औषधे वापरली जातात. हा उपचार 6 ते 9 महिने घ्यावा लागतो. क्वचित काही इंजेक्शनचा वापरही करावा लागतो. शासनाकडून क्षयरोग निर्मूलनासाठी मोफत उपाययोजना केंद्र सिव्हिल हॉस्पिटलमार्फत चालवले जाते. नऊ महिन्याचे पूर्ण उपचार शासनाकडूनच दिले जातात. रूग्णांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे.
निसर्गोपचार- सीताफळ- दोन सीताफळांचा गर, 25 बिनबियांचे बेदाणे पाण्यात घालून मंद आचेवर उकळावे. एक तृतीयांश आटवून गाळून घ्यावे. दोन चमचे बारीक केलेली खडीसारखर, दालचिनी, वेलची प्रत्येकी पाव चमचा घालावी. सकाळी एक चमचा व रात्री एक चमचा हे औषध घ्यावे.
शेवगा- 2 कप पाण्यात मूठभर शेवग्याची पाने घालून उकळावीत. मीठ, मिरपूड, लिंबाचा रस घालून अनशेपोटी हे सूप प्यावे.
दूधी भोपळा- उकडलेली दूधी नियमित खावी.
पुदिना- पुदिन्याचा ताजा रस एक चमचा, दोन चमचे शुध्द माल्ट व्हिनेगर व तेवढाच मध एकत्र करून पाऊण कप गाजराच्या रसात मिसळावे. हे औषध टॉनिक म्हणून वापरता येते.
होमिओपॅथि- जेव्हा रूग्णाची प्रतिकार शक्ती खूपच खालावते, कोणतीही औषधे लागू पडत नाहीत तेव्हा होमिओपॅथिचा उपयोग होतो. शरीरात नवीन संरक्षक पेशी तयार करण्यासाठी, रक्ताचा दर्जा सुधारण्यासाठी, रोगाचे संपूर्ण दमन करण्यासाठी होमिओपॅथि संपूर्ण रास्त व परिपूर्ण अपचारपध्दती म्हणून उपयोगात येते, पाहूया काही उदाहरणे.
कालीकार्ब- फुफ्फुस आवरणदाह, सटसटणार्या वेदना, डोळ्यावर चेहर्यावर सूज येणे, पहाटे पहाटे खोकल्याचा जास्त त्रास होणे अशा लक्षणांवर उपयुक्त असे औषध.
फॉस्फरस- थुंकीतून रक्त पडते, थंडगार पाणी किंवा सरबत प्यावेसे वाटते.
कॅप्सीकम- मुखदुर्गंधी, फुफ्फुसामध्ये पूं झाल्यामुळे सारखा खोकला येत राहतो.
बायोकेमिक- कालीफॉस, नॅट्रम फॉस, मॅगफॉस यांचे मिश्रण क्षयावर उपयुक्त असते.
इतर उपाय- रूग्णाने उपचारकाळात पूर्ण विश्रांती घ्यावी. मन शांत ठेवावे. कुठल्याही प्रकारच्या मानसिक ताणांमुळे रोग बरा होण्यास वेळ लागतो.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 9916106896
सरनोबत क्लिनिक 9964946918