पश्चिम भागातल्या दोन जिल्हा पंचायत सदस्याकडून वेगवेगळे विषय घेऊन अधिकारी आणि जिल्हा पंचायत अध्यक्षांना धारेवर धरले. सर्वात मोठी जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या बेळगाव जिल्हा पंचायतीत शनिवारच्या बैठक गाजवली ती सरस्वती पाटील आणि मोहन मोरे यांनीच..
.निधी वाटपामध्ये सदस्यांमध्ये भेदभाव केले जात आहेत त्याचबरोबर अधिकारी सदस्यांना काडीचीही किंमत देत नाहीत अध्यक्ष आपली मनमानी सुरू केली आहेत जर आपले काहीच काम नसेल तर जिल्हा पंचायत बरखास्त करा अशी मागणी करत अनेक सदस्यांनी व्यसपीठासमोर ठिय्या आंदोलन केले आणि अध्यक्षांवरही सदस्यांनी आरोप केला. सरस्वती पाटील यांनी सुवर्ण सौधला आम्हाला नेऊन काय केला असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी बैठकीच्या सुरवातीलाच गोंधळ झाला.
का महाराष्ट्रात जाऊ नये?मोहन मोरे
जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी मराठीत कागदपत्रांची मागणी करून किती दिवस उलटले याची कधी पूर्तता करणार असा प्रश्न मोहन मोरे यांनी उपस्थित करून कर्नाटकात मराठी भाषिक राहतात त्यांची चूक आहे का अस म्हणत अध्यक्ष अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.अधिकाऱ्यांच्या लोक प्रतिनिधींच्या मराठी विओर्धी धोरण मुळेच महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी जोर धरू लागळी आहे असा टोला देखील कॉंग्रेस सदस्य मोहन मोरे यांनी लगावला
बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागात रस्त्यांची अवस्था दयनीय आहे कित्येक बैठकातून अगोदर रस्त्यांची हालत सुधारा अशी मागणी करत या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून अध्यक्ष आशा ऐहोळे यांनी भेट देऊन देखील एक वर्ष झाल मात्र अध्याप या भागातील एक इंच रस्ता केला गेला नाही अस असेल तर जिल्हा पंचायत काय कामाची असा सवाल देखील त्यांनी केला.
कॉंग्रेस विकास कामात का दुजाभाव करतंय-सरस्वती पाटील
केवळ सत्ताधारी पक्षातील सदस्यांना निधी उपलब्ध करून देऊन विओर्धी गटातील मराठी भाषिक सदस्यांना विकास कामा करिता निधीच दिला जात नाही असा आरोप करत सदस्या सरस्वती पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जर का आम्हाला निधी देत नसाल बैठक रद्द करा मध्यान्ह आहार योजनेत गरोदर महिलांना दिले जाणारे धान्य इतर साहित्य वितरणात प्रचंड घोटाळा असून महिलांना आहार जेवण मिळतच नसल्याचा आरोप केला यावेळी इतर सदस्यांनी देखील आपले मनोगत मांडून अध्यक्षांच्या आसना समोर ठिय्या आंदोलन केल.