कर्नाटकातील मराठा समाजाला ३बी मधून २ अ आरक्षण द्या या मागणीसाठी क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या वतीने सुवर्ण सौध वर मोर्चा काढून निदर्शन करण्यात आली होती.
एक मराठा लाख मराठाच्या धर्तीवर कोंडस्कोप येथे मराठा समाजच्या वतीने निदर्शन करण्यात आली . कर्नाटकात मागासलेल्या मराठा समाजाचा ३बी मधून २ अ मधेय समावेश करावा अश्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या . आंदोलन स्थळी माजी मंत्री संतोष लाड, विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर ,आर व्ही देशपांडे तसेच समाज कल्याणमंत्री डी अंजनेय यांनी मराठा समाजाच्या मागणी मेनी करून घेण्यासाठी प्रयत्न करू तसेच विधी मंडळात हा आवाज उठवू असं आश्वासन दिले . यावेळी आमदार श्रीनिवास माने , घोटणेकर विनय कुलकर्णी आदींनी देखील भेट दिली . बेळगाव सह बिदर धारवाड हाळियाळ येथून मराठा समाज बांधव उपस्थित होते .
१६ फेब्रुवारीच्या मराठा क्रांती मोर्च्यात सुरुवातीच्या काळात सीमा प्रश्नाची मागणी घालण्यास नकार देऊन खो घालणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी या मोर्चात मराठा बांधवाना एकत्रित करून गर्दी करणे गरजेचे होते मात्र म्हणावा तेवढा हा मोर्चा यशस्वी झाला नाही आंदोलकांत म्हणावा तेहहा जोश नव्हता . सीमा प्रश्नाची मागणी असल्यासच बेळगावात मराठा जागा होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे .