बुधवारी रात्री बेळगाव परिसरात निर्माण झालेली दंगल आणि दगड फेकीत काही वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
परिस्थिती नियंत्रणात आणत असताना पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना डोक्याला दगड लागल्याचे वृत्त आहे, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
दंगलखोरांनी सीबीटी भागातही काही वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे.
या घटनेत अंदाजे 8 जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे.रात्रीचे बारा वाजता परिस्थिती नियंत्रणाखाली आली आहे गरिबांच महाबळेश्वर म्हणून गणल्या जाणाऱ्या बेळगावकर जनतेला बेळगाव live च्या वतीनं पुन्हा एकदा शांततेच आवाहन करत आहोत.
Trending Now