बेळगावात कर्नाटक सरकारचे अधिवेशन सुरू आहे, या परिस्थितीत अशांतता पसरविणारे जयकांत शिकरे वेगळेच आहेत, या परिस्थितीत सामान्य बेळगावकरांनी शांतता पाळणे महत्वाचे आहे.
पोलीस प्रशासन सध्या बंदोबस्त कामात व्यस्त आहे. मंत्री, आमदार, खासदार यांची सोय त्यांना करावी लागत आहे, अशावेळी अशांतता पसरवून गोंधळ माजवणे हा प्रयत्न आहे, त्यावेळी कोणतेही अनुचित कृत्य होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठी भाषिकांचा विरोध कर्नाटकाच्या अधिवेशनाला आहे , मात्र बेळगाव ची शांतता भंग करण्यात मराठी भाषिकांचा हात नाही, या कृत्यांमध्ये मराठी माणसाला जबाबदार ठरवून स्वतः स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या मंडळींना पोलिसांनी धडा शिकवण्याची गरज आहे.