Sunday, May 5, 2024

/

महामेळावा झाला पुढे?

 belgaum

बेळगावात काल सीमावासीयांचा महामेळावा झाला. हजारो सीमावासीयांनी एकवटून महाराष्ट्रात सामील होण्याच्या घोषणा दिल्या, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मेळावा झाला, बंदी झुगारून महाराष्ट्रातील माजी मंत्री, आमदार आणि खासदार येऊन गेले, आता पुढे काय हा प्रश्न आहे.
काळ्या दीना पासून पाहता ग्रामीण भागातील तरुणाईची अनुपस्थिती त्रासदायक ठरत आहे. ग्रामीण भागातील महिला आणि जुने कार्यकर्ते येत असताना तरुण वर्ग कुठे हरवला हे शोधून काढायची गरज आहे.
शहरी तरुण सीमाप्रश्नापासून दूर गेला असा आरोप पूर्वी होत होता मात्र हा आरोप आता करण्याची वेळ संपली आहे, सध्या ग्रामीण तरुणांची मोट पुन्हा एकदा बांधण्याची नितांत गरज आहे.
महामेळाव्यात उपस्थित झालेल्या सीमाभागाच्या आमदारांनी नेमके विधानसभेत मराठी आवाज घुमवण्यासाठी काय केले हा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जायचे, मराठी बोलण्याचा तुटपुंजा प्रयत्न करायचा आणि निघून यायचे, आम्ही सभात्याग करून आलोय असे सांगायचे या व्यतिरिक्त मराठी जनांना त्यांचे अधिकार मिळावेत म्हणून सभापतीसमोर किती वेळ आवाज किंवा प्रश्न उपस्थित केले हे बघावे लागेल, या आमदारांची फक्त एवढीच जबाबदारी आहे का हा प्रश्न आहे.दक्षिणचे आमदार सभागृहात काल चिडीचूप होते हा देखील चर्चेचा विषय आहे.kp pati mes
आता निवडणुकी येणार आहेत आणि त्यापूर्वी एक व्हा असा मंत्र महाराष्ट्राने दिला आहे, एक कोण आणि केंव्हा होणार हा प्रश्नही गंभीर आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.