अथर्व माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा. अगदी छान गणपतीसारखाच गुटगुटीत बाळसेदार, गोरागोमटा. मी त्याला एक तीन चार वर्षाचा असताना पाहिलेला. पण परवा त्याची आई त्याला दाखवायला घेऊन आली. आता तो नऊ वर्षाचा झाला आहे. पण कमालीचा बदल झालेला. गाल आत गेलेले, चेहरा काळवंडलेला, दात पुढे आलेले पडून नव्याने आलेल्या दातात फटी, हिरड्या दिसण्याइतपत सुजलेल्या, तोंड उघडेच! दातावर पिवळट जाड थर मैत्रिणीने सांगण्यास सुरूवात केली की अथर्व नाकाने श्वास घेतच नाही. तोंडानेच घेतो. सारखा सर्दी- खोकला होतो. भूक लागत नाही. चिडचिड करतो. अंथरूणात सू करतो, बैचेन राहतो. इ. इ.
या प्रकारच्या चेहर्याच्या प्रकाराला इल्फिक फिशीज म्हणतात, याचं कारण असतं अॅडिनॉईड्स. घशामध्ये कसे टॉन्सिल असतात तसेच नाक व घशाच्या जॉईंटमध्ये अन्ननलिका व श्वासनलिकेच्या जॉईंटमध्ये कधी कधी अन्ननलिकेतसुध्दा आढळून येतात. ही लिम्फ नावाची ऊती (लिम्फॉईड टिश्यु) असते. बाहेरून येणार्या जीवतंतूशी लढण्याचे काम हा पेशीसमूह करत असतो. रक्त वाहिन्यांशी समांतर असे लिम्फ वाहिन्यांचेही एक जाळे असते.
सातत्याने जर घशाचे इन्फेक्शन होत राहिले तर हे ऑडिनॉईड्स सुजतात. त्यामुळे नाक व घशाचा पॅसेज ब्लॉक होतो. नाकाने पुरेसा श्वास घेतला जात नाही. मग नाक दाबले की तोंड उघडते. या म्हणीप्रमाणे तोंड उघडे राहून तोंडाने श्वास घेतला जातो. ऑडिनॉईड्सचा उपचार जर वेळेत झाला नाही तर जागतेपणी, झोपेत तोंड उघडे राहिल्यामुळे नवीन दात येताना दात पुढे येतात. दातात मोठ्या मोठ्या फटी होतात. तोंडाला घाण वास येऊ लागतो. लाळ कमी होते. भूक मंदावते. मूल चिडचिडे बनते. त्याशिवाय सारखे सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन चालूच राहते. कित्येकदा दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. परंतू मूळ आजार बरा झाल्याशिवाय दातांचे उपचार पूर्ण होतच नाहीत.
’अथर्व’ च्या आजाराने निदान व्यवस्थित झाल्यामुळे उपचारही सुलभ झाले. होमिओपॅथिने विकार बरा होण्यासाठी आठ महिने लागते. सारखाच होणारा सर्दी खोकला यथावकाश बंद झाला. नंतर दातांची ट्रीटमेंट दातांच्या डॉक्टरकडे सुरू करण्यात आली आहे.
अॅडिनॉइड्सची इतर लक्षणे
नाक चोंदणे, श्वास घेण्यास आयास होणे, गिळता न येणे.
> नाक वाहाणे, घशातले इन्फेक्शन युस्टेशियम ट्यूबव्दारे कानाकडे जाऊन कान फुटणे.
भूक मंदावणे, कशातही इंटरेस्ट न वाटणे, अशक्तपणा क्वचित नाकातून रक्त येणे.
घशामध्ये गाठी येणे, घसा दुखणे, घशातील तर लिम्फ नोडस सुजल्यामुळे असे होते.
कित्येकदा अॅडिनॉईड्स आणि टॉन्सीलायटीस दोन्ही एकाचवेळेेला आढळून येतात.
उपचार- निसर्गोपचार- गुळण्या केल्याने माफक आराम मिळतो. तेलकट, थंड पदार्थ खाण्यास देऊ नयेत. पावसात भिजणे टाळावे. लहान मुलांना अॅडिनॉईड्सचा त्रास असल्यास एका कुशीवर झोपवावे. साधारण श्वासोच्छवास अडचणीचा होत नाही. कडकडीत गरम दुधात चिमुटभर हळद व मिरेपूड घालून रोज असे दूध पिण्यास द्यावे.
एक लिटर पाण्यात दोन मोठे चमचे मेथ्या घालून अर्धा तास उकळवाव्या. पाणी किंचित गार झाल्यावर त्याचे गुळण्या कराव्यात, घशाचा, कानाचा दाह कमी होतो.
होमिओपॅथी-
अनेक आजार, अनेक लक्षणे, बरेच विकार आणि लागू पडणारे फक्त होमिओपॅथिक उपचार बर्याच केसीसचा अनुभव आणि होमिओपॅथिक औषधांची समग्र माहिती यामुळे उपचार सुलभ होतात. होमिओपॅथिमध्ये बरेच संशोधन आजवर झाले आहे. त्यातून प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथि नावाचा एक विचारस्त्रोत प्रचलित झाला आहे. आजारांचे भाकित करणे किंवा आधीच्या आजारातून पुढच्या होणार्या आजारांचे भविष्य ठरवणे हे प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथिव्दारे सहज साध्य झाले आहे. त्यासाठी रूग्णाचा अभ्यास व होमिओपॅथिचा ताळमेळ खूप आवश्यक आहे.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 9916106896
सरनोबत क्लिनिक 9964946918
Good read.