टिपू सुलतान यांच्या वर वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे सुरेश अंगडी आणि राम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर यांच्या वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी टिपू सुलतान संघर्ष समितीने केली आहे.
शनिवारी सकाळी शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत ही मागणी केली आहे.
इतिहासानुसार टिपू सुलतान हे पहिले ब्रिटिशां विरोधात लढलेले स्वातंत्र्य सैनिक होते अस असताना त्यांना बलात्कारी केवळ मुस्लिमांना वाचविलेले सामान्य जनतेसाठी काहीही योगदान नसलेले म्हणत खोटे माहिती समाजात पसरवत आहेत अश्यावर कारवाई करा अस देखील निवेदनात स्पष्ट केले आहे.
टिपू जयंती निर्णय रद्द करा-जनजागरण समिती
टिपू सुलतान यांच्या जयंती साजरी करण्याच्या निर्णया बद्दल राज्य सरकार ने पुन्हा एकदा फेर विचार करावा अशी मागणी करत हिंदू जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करण्यात आली.
टिपू सुलतान यांनी हिंदू विरोधी कृत्य केली आहेत त्यामुळे अनेक खासदारांनी त्यांना क्रूर कर्मा आणि बलात्कारी संबोधलं आहे.इंग्रजानी नेमलेल्या गॅजेट मध्ये टिपू यांनी 8 हजार मंदिर नाश केली होती असा उल्लेख आहे मंदिर तोडफोड आणि गो हत्त्या करणारा राजा होता अस देखील
जिल्हाधिकाऱ्या द्वारे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केलं आहे.शासनाने टिपू जयंती बद्दल पुन्हा एकदा विचार करावा अशी मागणी केली आहे.
राम सेनेच्या नेत्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
टिपू संघर्ष समितीच्या वतीने राम सेनेच्या एका नेत्याचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी कार्यालया समोर करण्यात आला मात्र लागलीच पोलिसांनी सदर पुतळा हिसकावून घेतला आणि सर्व टिपू संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याना हिसकावून लावले.