Friday, April 19, 2024

/

गवताचा भारा नेताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

 belgaum

गवताच्या भाऱ्याचा विद्युत भारित तारेला स्पर्श झाल्याने करंट लागून वृद्ध शेतकरी ठार झाल्याची घटना धामणे शिवारात घडली आहे.बाबू निगांप्पा खनाजी वय 68 रहिवाशी धामणे अस मयत झालेल्या शेतकऱ्याच नाव आहे.

Farmer
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू हे नेहमी प्रमाणे गवत आणण्यासाठी शेतात गेले होते गवताचा भारा घेऊन घरी परतत असतेवेळी ओले असलेले गवत विद्युत भारित तारेला स्पर्श झाले त्यामुळे शॉक लागून सदर शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे. ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे

धामणे शिवारात अनेक ठिकाणी इलेक्टरिक वायर खांब नसून लाकडी खांब वरून नेण्यात आल्या आहेत अश्या वायर अनेक ठिकाणी लोम्बकळत असतात त्यामुळे इथून ये जा करताना शेतकऱ्यांना याचा अंदाज येत नसतो हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा हा बळी असल्याचा आरोप धामणे ग्रामस्थानी केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.