बेळगावच्या सांबरा विमानतळावर नव्याने बांधण्यात आलेल्या टर्मिनलचा वापर आजपासून सुरू झाला आहे.
काल दि १५ रोजी जुन्या टर्मिनल मधून शेवटचे विमान उड्डाण झाले, आजपासून सारेकाही नव्या टर्मिनल मधून सुरू झाले आहे. बीसीएएस आणि डिजीसीए च्या सर्व परवानग्या आत्ता मिळाल्या आहेत म्हणजेच पूर्णपणे सुरक्षित विमानतळ हा दर्जा सिद्ध झाला आहे.
सर्वप्रकारची आधुनिक सुरक्षा व्यवस्था या इमारतीत बसवण्यात आली आहे. नव्या टर्मिनल इमारतीच्या उदघाटनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
स्थानिक संगीत आणि नृत्य कार्यक्रम साठी अपटेक एव्हीएशन , पोदार स्कूल आणि जैन हेरिटेज स्कूल चे विध्यार्थी दिवसभर उपस्थित होते एअर पोर्ट कर्मचाऱ्यांनी सर्व बंगळुरू चेन्नई मुंबई विमानाचं प्रवाश्यांच देखील स्वागत केलं.
सकाळी ९ वाजता रांगोळी आणि जल सलामीने विमानाचे स्वागत झालं . नवी टर्मिनल इमारत ही कला आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे, येथे आता नवनव्या विमान सेवांची भर पडणार आहे.