13 ते 24 नोव्हेंम्बर पर्यंत बेळगावात हिवाळी अधिवेशन
उत्तर कर्नाटकाच केंद्र बिंदू ठरलेल्या बेळगावात पुन्हा एकदा विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन भरवण्याचा घाट कर्नाटक शासनाने घातला आहे.
बुधवारी बंगळुरू येथे झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय होणार होता पुढील बैठकीत यावर निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली आहे.बेळगाव जिल्ह्यात आता चौदा तालुके होणार आहेत आजच्या मंत्रिमंडळा च्या बैठकीत मुडलगीला नवीन तालुक्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जारकीहोळी बंधूंच्या प्रयत्ना मुळे मुडलगीला नवीन तालुक्याचा दर्जा मिळाला आहे.