नाकाच्या ओलसर अंतर्त्वचेचा वारंवार दाह झाल्याामुळे त्या त्वचेतूनच हळुहळू मांसाची वाढ होऊ लागते, द्राक्षाच्या आकारासारखे मांस नांकात वाढू लागते. त्यामुळे श्वासोच्छवासाला अडथळा होणे, वारंवार आतोनांत सर्दी होणे, नाक गळणे, गच्च होणे अशी लक्षणं आढळून येतात. नाकांतले मांस वाढणे सावकाश वाढत जाणारा आजार आहे. जुनाट सर्दी या विकारात रूपांतरीत होऊ शकते.
नाकातले मांस दोन प्रकारे वाढू शकते. बाह्य नाकपुडीत याचे देठ असून मुख्य भाग नाकाच्या आतल्या भागाकडे उलट वाढतो किंवा दुसरा प्रकार म्हणजे आतल्या नाकाच भागात याचे देठ असून नाकाच्या पसरट भागात हे मांस लोंबत असते. या विकाराकडे दुर्लक्ष केल्यास हे मांस आडवेतिडवे वाढून पूर्ण नाकपुडी व्यापू शकते व एका बाजूने श्वासोच्छवास पूर्ण बंद होतो. धाप लागते. बोलताना अनुनासिक गेंगणा आवाज येतो. वारंवार नाक गळते, नाक गच्चही होते. नाकात सारखे वळवळल्यासारखे होते. बाहेरून नाकाचा आकार वाढून नाक फेंदारल्यासारखे बेढब दिसते. नाकाची वास घेण्याची क्षमता कमी होते. श्वास अपूर्ण घेतल्याने डोके दुखते, छातीत दडपण आल्यासारखे वाटते.
नाकातले मांस वाढणे हा देखील एक अॅलर्जीचा प्रकार आहे. अतिप्रमाणात मांस वाढले असल्यास रूग्णाच्या स्वस्थतेकरता कधी कधी ऑपरेशनही करावे लानते. परंतु ऑपरेशन केल्याने हा विकार समूळ नष्ट होत नाही. झाडाची मुळं राहिल्यावर पुन्हा अंकुर फुटतो. त्याप्रमाणे पुनःश्च मांस वाढू शकते. अशा वेळेस रूग्णाला तात्पुरता आराम मिळण्यासाठी शस्त्रक्रिया करून मग पुन्हा मांस वाढू नये, यासाठी होमिओपॅथिक ट्रिटमेंट दिल्यास हा विकार पूर्णतः नाहीसा होतो.
या विकाराची सुरूवात असल्यास किंवा मध्यम स्वरूपात मांस वाढले असल्यास होमिओपॅथिक औषधाने रूग्ण पूर्णतः बरा होतो. नऊ वर्षाची निकीता, जरासा सावळा वर्ण, एकदम बारीक, त्वचा रूक्ष आणि खरखरीत तिला पाचसहा वर्ष कायमच सर्दीचा त्रास व्हायचा. त्यात तिची जन्मापासून वाढ तशी सावकाशच उशिरा दात येणं, उशिरा चालणं, उशिरा बोलणं इ. शिवाय तिची टाळूसुध्दा उशिरा म्हणजे जवळजवळ दीड वर्षांनी भरली होती. म्हणजे सगळे वाढीचे टप्पे अगदी सावकाश झाले होते. इतर शरीराच्या मानाने पोटाचा आकार मोठ्ठा दिसत होता. अधूनमधून तिला खडू, माती, विटांचे ठिसूळ तुकडे असं काही तरीच खावंसं वाटायचं. तिची इतर लक्षणं व ही व्यक्तीवैशिष्ट्ये एका होमिओपॅथिक औषधाशी तंतोतंत जुळत होती. ते औषध तिला ठराविक मात्रेत, ठराविक कालावधीसाठी दिले असता तिला पूर्णतः बरे वाटले. नाकातले मांस वाढण्याची प्रक्रिया बंद झाली, त्याचा आकार हळुहळू कमी झाला. तब्येत सुधारली, चेहर्यावर तेज आलं आणि दीड वर्षात तिचा आजार समूळ नाहिसा झाला.
होमिओपॅथि-
कॅलकेरिया फॉस,कॅल्केरिया कार्ब, फॉस्फरस, सँग्वेनिरीया, आयोडम, ट्युक्रियम, थुजा, स्पाँजिया अशी औषधं उपयुक्त असतात. दीर्घकालीन उपचार घ्यावे लागतात.
बायोकेमिक (बाराक्षार)- नॅट्रम सल्फ 3ु, कॅलकेरिया फ्लूर 12ु, सिलीशीया 12ु अशी औषधं होमिओपॅथिला जोड उपचार म्हणून देता येतात.
घ्यावयाची काळजी- हा विकार असणार्यांनी धूळ व धुरापासून संरक्षण करण्यासाठी नाकावर रूमाल बांधावा. वार्यात जास्त जाऊ नये. तसेच उग्रवासाची औषधं किंवा परफ्यूम वापरू नये. त्यामुळे नाकातील अंतर्त्वचेचा अतिदाह होऊन नाकातून रक्त येऊ शकते. शक्यतो उताणे झोपू नये कारण श्वासमार्गात अडथळा तयार होऊन एकदम श्वास कोंडू शकतो. अधूनमधून कोमट पाण्यात किंचीत मीठ घालून नाकपुड्या स्वच्छ कराव्यात नेजल पॉलीप असून दमा असणार्यांनी अॅस्पीरीन कधीही घेऊ नये, कारण त्याने श्वासनलिका एकदम आकुंचन पाऊल श्वास घुसमटण्याची शक्यता असते.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 08312431362
सरनोबत क्लिनिक 08312431364
मॅडम मला नाकाचा खूप त्रास आहे नेहमी नेजल स्प्रे चा वापर करावा लागतो तुमची वेळ कधी मिळेल
मयुर मुंडे-9922651212
Maza mulaga 6 varshacha aahe tyachya nakatil had vadhale aahe Kay karave
Hiii,Mam,……..
मला ही नाकाचा त्रास होतोय आजकाल झोपले की उजवे नाक बंद होते , आणि मग एक आंगदावर झोपावे लागते
9809090713, 7057664975
PlZ help me