बेळगावात अशा काही व्यक्ती आहेत ज्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बेळगावचे नाव रोशन करतात. वेगा ही हेल्मेट उत्पादक कम्पनीही यापैकीच एक. देशातल्या हेल्मेट उत्पादनात वेगाचा ३५ टक्के वाटा आहे, आता या कम्पनीचा नवा प्रकल्प येत आहे, यामुळे २०२० पर्यंत जगातली क्रमांक १ ची कम्पनी होण्याचा मान वेगाला मिळू शकतो.
सध्या दररोज १२००० हेल्मेट ही कम्पनी बनवते. उद्यमबाग, पिरनवाडी आणि उत्तराखंडच्या रुद्रपूर येथे असे ४ उत्पादन प्लांट आहेत. नवीन प्रकल्प सुरू झाला की रोजचे उत्पादन २० ते २२ हजार पर्यंत जाऊ शकते. अशी माहिती वेगा ऑटो असेसरीज प्रा ली चे डायरेक्टर दिलीप चांडक सांगतायत.
Trending Now