डुप्लिकेट मार्क्सकार्ड तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी केला असून तिघांना अटक केली आहे. या डुप्लिकेट मार्क्स कार्डानी न्यायालयात नोकरी मिळवण्याचा प्रयत्न फसला आहे.
एकानें न्यायालयात peon नोकरीसाठी दोन हुद्द्यांसाठी वेगवेगळ्या सातवी उत्तीर्ण झालेले मार्क्स कार्ड जमा केले होते यासाठी सहकार्य केलेल्या तिघांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गदग जिल्ह्यातील अमरोळ गावच्या शरणय्य चनयया हिरेमठ याने नोकरीसाठी डुप्लिकेट दिले होते याला पोलिसांनी अटक केली आहे तर शरनय्य याला मदत करणारा सरकारी शाळेतील शिक्के वापरून मार्क्स कार्ड बनवणारा शाळेचा मुख्ताध्यापक नारायण नायक,तसेच न्यायालयात कार्यरत के रत्नम्मा, तसेच अंदाय्या हिरेमठ यांना देखील ताब्यात घेतलं आहे.चित्रदुर्ग मध्ये घडलेल्या घटनेचे बेळगाव मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे