Wednesday, May 1, 2024

/

राकसकोप जलाशयातील पाण्यावर फेस

 belgaum

गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने  राकस्कोप जलाशयात पाण्यावर फेस आला आहे, सिटीझन फोरम चे अनिल देशपांडे यांनी वारंवार लक्ष वेधून ही दुर्लक्ष केल्याचा फटका बसत असून पाणी दूषित झाले आहे.
बंगळूर येथील बेल्लांदूर आणि वर्थूर तलाव असेच फेसच्या पाण्याने दूषित ठरले. बेलंदर तलावातील फेस वाऱ्याने उडत सभोवतालच्या परिसरात उडत असतो शहरातील वेस्ट मनजमेंट ची  योग्य विल्हेवाट लावण्यात अपयश आल्याआहे दोन्ही तलाव प्रतीक आहेत. सकाळी राकसकोप येथेही अशाच फेसाच्या लाटा दिसल्या आहेत. पाण्याच्या सुरक्षिततेसाठीची ही पहिली नैसर्गिक सूचना आहे.

गेली कित्येक वर्षे राकसकोप जलाशय हे बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणार मोठं स्तोत्र आहे आणि त्यातच जलाशय काठावर फेस आल्याने हे नुकसान दायक आहे या जलाशयात गाळ असून तो काढा अशी मागणी सिटीझन फोरम चे अनिल देशपांडे यांनी केली होती. मात्र फक्त पैसे खाण्यात गुंतलेले नगरसेवक, महा पालिका आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी लक्ष देत नाहीत, हिच शोकांतिका आहे.

 belgaum

सध्या जरी बेळगावतल्या जलाशयातील फेस कमी असला तरी लवकरच उपाय केला गेला नाही राकसकोपचा बेलंदर तलाव व्हायला वेळ लागणार आहे. फेस येण्याचं नेमकं कारण शोधून अधिकाऱ्यांनी यावर उपाय करावा अशी मागणी केली जात आहे. रसायन मिश्रित पाणी विसर्ग कुठून होतो याचा शोध लावावा लागणार आहे.शेतवडीतील फर्टिलायजर युक्त पाणी जलाशयात मिश्रित होत आहेत का याचा देखील तपास लावावा लागणार आहे.

फोटो सौजन्य-ऑल अबाऊट बेलगाम

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.