Wednesday, December 18, 2024

/

 अग्री एअर कार्गो विमानसेवा सुरू करा

 belgaum

Citizen councilबेळगाव परिसरातील शेती माल फुल आणि हिरव्या भाजीपाल्याला जगप्रसिद्ध बनवून योग्य भाव मिळवून देण्यासाठी एअर कार्गो सुरू करण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सिटीजन कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे.

बेळगाव एअर पोर्टचे मॅनेजर राजेशकुमार मौर्य यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे. बेळगावातील शेती माल खूप प्रसिद्ध आहे वेगवेगळी फुलं हिरव्या भाजी एअर कार्गो द्वारे जगभरात जाऊन योग्य सोय होऊ शकते  अस देखील निवेदनात म्हटले आहे.मौर्य यांनी एअर कार्गो बाबत स्वतः केंद्रीय विमान उड्डाण मंत्री गजपती राजू यांच्या निदर्शनास आणून देऊ अस आश्वासन दिलं.यावेळी सतीश तेंडुलकर,बसवराज जवळी,विकास कलघटगी शेवंती लाल शाह आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.