वकिलांचा विरोध डावलून जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोरील बॅरिकेट्स घालण्याचे काम पूर्ण केले आहे. दुसरा शनिवार रविवार अशी कोर्टाच्या कामकाजाची सुट्टी पाहून प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रोडवर काँक्रीट आणि लोखंडी दुभाजकासह बॅरिकेट्स घातले आहेत
गेल्या चार दिवसापूर्वी वकिलांनी रास्त रोको आंदोलन करत बॅरिकेट्स घालण्यास विरोध केला होता शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात हे काँक्रेट घालण्याचे काम सुरु करण्यात आले होते घटना स्थळी मार्केट ए सी पी शंकर मारिहाळ लक्ष ठेऊन होते . मुख्य रास्ता बॅरिकेट्स ने बंद करून अंडर पास चा वापर केला जावा यासाठी आम्ही बॅरिकेट्स घालून कोर्टाच्या आदेशाचा पालन केले आहे अशी प्रतिक्रिया ए सी पी शंकर मारिहाळ यांनी बेळगाव live शी बोलताना दिली आहे.
कोर्ट समोरील मुख्य रास्ता बॅरिकेट्स घालून बंद केल्याने सोमवार पासून वकील आणि इतरांना जिल्हाधिकारी कार्यालयातुंन वरील जे एम एस सी कोर्टात चालत जायचे असल्यास अंडर पास वापर करावा लागणार आहे आई सोमवार पासूनच अंडर पास वापरास गती येणार आहे