Wednesday, April 24, 2024

/

चिमुरडीवर बलात्कार करून पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरधामास ग्रामस्थांकडून चोप

 belgaum
 अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जिवंत गाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरधमास आमच्या स्वाधीन करा त्याला ग्रामस्थ शिक्षा देतील अशी मागणी करत बैलहोंगल येथील वन्नुर ग्रामस्थांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर  आंदोलन सुरु केलं आहे .  पीडित बालिकेस  उपचारासाठी बेळगावातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात  आले असून तिची स्थिती  चिंताजनक आहे .
बैलहोंगल तालुक्यातील वन्नुर गावातील शाळेजवळ खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार  करणाऱ्या  नाव सुभाष महादेव नायकर (24, वन्नूर, ता. बैलहोंगल) असे या नराधमाचे नाव आहे. हा नराधम घटनेनंतर सदर मुलीला शाळेच्या आवारातच खड्डा खणून पुरण्याच्या तयारीत होता. परंतु, मुलीला शोधणारे वडील व गावकऱ्यांमुळे तो रंगेहाथ सापडला. अडीच वर्षाची बालिका गावातीलच कन्नड शाळेजवळ शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खेळत होती. यावेळी सुभाष हा तेथे बसला होता. त्याने सदर बालिकेला जवळ बोलावून घेऊन नंतर शाळेच्या पाठीमागे नेले होते
 सात वाजले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून बॅटरी घेऊन ते गावातील काही लोकांसह शोधण्यासाठी बाहेर पडले. गावात शोध घेत असताना मुलीचे वडील व गावकरी कन्नड शाळेच्या आवारात पोहोचले. शाळेच्या पाठीमागे बॅटरीच्या उजेडात पाहिले तेव्हा तेथे सुभाष हा खड्डा खणत असल्याचे आढळून आले. बाजूलाच एका मुलीचा रडण्याचा आवाजही येत होता. सुभाषने सदर बालिकेवर अत्याचार करून तिला जिवंत पुरण्याची योजना आखली होती. बालिकेला बाजूला झोपवून तो या ठिकाणी खड्डा खणत होता. याचवेळी मुलीचे व वडील व गावकऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. हे कृत्य केले तेव्हा सुभाष नशेत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. घटना पाहून संतप्त बनलेल्या गावकऱ्यांनी त्याला तेथेच बेदम मारहाण केली. यानंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सदर मुलीला जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. सदर तरुणालाही अटक करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. नेसरगी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल जवळ स्थानिक कार्यकर्त्यांचीही गर्दी होत आहेCivil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.