Tuesday, September 17, 2024

/

भविष्य घडवणारे घर बांधणारे किमयागार

 belgaum

हे शिर्षक थोडे वेगळे वाटेल, वाटेल नाही वाटणारच, काहींना वाटेल एखाद्या बिल्डर किंवा निवासी वसाहतीची जाहिरात आहे, होय जाहिरात आहेच ती भविष्य घडविणारे घर बांधणाऱ्या किमयागाराची. तुम्हाला ही संकल्पना किंवा अशी माणसे या आपल्या गावात आहेत याची कल्पना असेलही. कारण ही किमयागारी कुठेच लपून राहिलेली नाही, या व्यवसायिकतेला आध्यात्म आणि वास्तुशास्त्राची जोड आहे, इंग्रजीत ज्याला customer satisfaction म्हणतात ते सारे इथे आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे माणसांनी राहण्यासाठी आणि वृद्धिंगत होण्यासाठी घर ही कल्पना मानून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच चांगली गोष्ट बेळगाव live च्या वाचकांना समजावी हा उदात्त हेतू या लेखनात आहेVijay patilप्रस्तावना फार झाली ना, आता नाव सांगतो, हे जे काही वर्णन तुम्ही वाचलेत ते आहे, बिल्डर विजय पाटील यांचे, त्यांच्या विशाल इन्फ्राबिल्ड या कंपनी चे आणि त्यांच्या एकापेक्षा एक construction project चे. बेळगावात जन्मलेल्या, पेपर विकत, लॉटरी विकत, वेगवेगळ्या agency चालवत स्वतः घडलेल्या. मनाने आणि स्वभावाने घडलेल्या आणि नावाप्रमाणेच साऱ्या समस्यांवर खरेपणा व संघर्षाच्या कसोटीत अध्यात्माची जोड देऊन नावाला साजेसा विजय मिळवलेल्या विजय पाटील यांची गोष्टच वेगळी आहे. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक माणूस आज धन्य आहे, याच साऱ्या गोष्टी त्यांना त्यांच्या बांधकाम प्रकल्पातही कामाला आल्या आहेत. आज ते खरेपण जगणारे बिल्डर म्हणून ओळखले जातात आणि धंद्यापेक्षा त्यांना माणुसकी महत्वाची आहे.

 

बेळगाव live ने या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, जे काही मिळाले ते सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. विजय हे परिस्थितीशी झगडत मोठे झाले. बांधकाम क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला तो काळ बरबटलेला होता. फसवणूक, लुबाडणूक आणि गंडवणुकीच्या मध्यावर फसलेल्या काळात ते या क्षेत्रात आले. कुणीही कमी रेट मध्ये कुणाच्याही जमिनी घ्याव्या आणि आकार प्रकार नसताना कशाही इमारती उभाराव्या, त्या विकाव्या आणि पुढे तक्रारी आल्या की हात वर करावे असा ट्रेंड या व्यवसायात होता. अशा काळात प्रामाणिकपणा जोपासणारे विजय पाटील इतरांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरत होते, मात्र कुणी चेष्टा केली म्हणून अंगभूत सच्चाई सोडून देणे त्यांना आवडले नाही, म्हणूनच त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व आज तयार केले .

सृष्टी, संस्कृती या अपार्टमेंट पाठोपाठ त्यांनी स्कायपार्क हा बेळगावातील पहिला १० मजली बांधकाम प्रकल्प उभारला. सध्याच्या demonetization च्या युगातही त्यांच्या प्रकल्पांना मागणी आहे. याचे श्रेय त्यांच्या वास्तू शास्त्राच्या आग्रही पणाला द्यावेच लागेल. बेळगाव live ची टीम त्यांना भेटली तेंव्हा त्यांनी एक अनुभव सांगितला, एक व्यक्ती त्यांच्या skypark या प्रकल्पात घर घ्यायला आली, बरोबर त्यांनी आपले एक मार्गदर्शक स्वामी आणले होते, ते सम्पूर्ण फ्लॅट पाहून जेंव्हा पार्किंग विभाग बघत होते तेंव्हा विजय पाटील यांच्या समोर गेले. ते स्वामि संयमी होते, ते एवढेच म्हणाले स्वतंत्र घर बांधतानाही वास्तू शास्त्र ८० टक्केच अंमलात आणता येथे, मात्र तुम्ही फ्लॅट १०० टक्के वास्तूत बसवला आहे.  इतकेच नव्हे तर पार्किंग विभागही पूर्ण वास्तूच्या नियमात आहे, हीच आपल्या कामाची खरी पोचपावती आहे असे ते म्हणाले. आपला आग्रह आणि वास्तु सल्लागारांची मदत कामाला आली असे ते सांगतात.

 

वास्तुशास्त्र किंवा देव हे सारे थोतांड मानणारी मंडळी असतात, पण किमान आपण राहतो ते घर तरी राहण्यायोग्य असले पाहिजे. आपण घर एकदाच घेतो. तेथे शांतता, समाधान आणि समृद्धी पाहिजे असेल तर वास्तुशास्त्र पाळले पाहिजे, नाहीतर जे काही होईल ते समस्यांनाच जन्म देईल, असे ते विश्वासाने सांगतात. यामागे फक्त व्यावसायिकता नाही तर प्रामाणिकतेची प्रचिती बघायला मिळते. आजवर त्यांनी वास्तू शास्त्राच्या जोरावर अनेकांच्या समस्या सोडवल्या आहेत, म्हणूनच भविष्य घडवण्याचे त्यांचे काम सुरूच आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.