Thursday, May 2, 2024

/

त्या नाल्याच्या शोधासाठी सर्व्हे

 belgaum

NAla serveySeven Construction या नावे जाधव नगर येथे सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या बांधकामपूर्वी येथील नाला वळवण्यात आला अशी तक्रार आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास राव यांनी केल्यावरून गुरुवारी मनपा, बुडा व भूमापन खात्यातर्फे सर्व्हे करण्यात आला. यावेळी अपार्टमेंटचे मालक फैजान सेठ आणि कैफ नुराणी यांनी हे प्रकरण ब्लॅकमेलिंग चे असून शंकर अमाशी या आरटीआय कार्यकर्त्याने आपल्याकडे लाखो रुपये मागीतल्याचा आरोप केला असून त्याची विडिओ टेप सादर केली आहे.

या प्रकरणात तक्रार करणारे श्रीनिवास यांनी आपला शंकर याच्याशी काहीच सम्बन्ध नसून हा आरोप आपल्यावर नाही, आपण जे काही सत्य ते मांडले आहे. आता सर्व्हे झालाय उत्तर काय येते ते बघू, एक सामान्य नागरिक म्हणून तो नाला प्रशासनाने पूर्ववत मिळवून द्यावा हीच आपली मागणी आहे, असे सांगितले.

आता कोण खरे आणि खोटे हे सर्व्हे चा अहवाल आल्यावरच  स्पष्ट होणार आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.