Monday, April 29, 2024

/

आर सी यु भ्रष्टाचाराची चौकशी करा-दलित संघटनेची मागणी

 belgaum

राणी चन्नम्मा विश्व विद्यालयात झालेला भ्रष्टाचार,कर्मचारी नेमणुकीतील घोटाळा याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी विविध दलित संघटनांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत निवेदन देत ही मागणी करण्यात आली आहे.तर विश्व विद्यालयाच्या आवारात विध्यार्थ्यांनी देखील आंदोलन केले आहे.


आर सी यु मध्ये शिकणाऱ्या अनेक दलित विध्यार्थ्यांना कन्नड विषय प्रमुख प्रा डॉ गंगाधरय्या यांनी मानसिक छळ करत अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करत भेडसावत असल्याची देखील तक्रार करण्यात आली आहे.शिक्षण मंत्री बसवराज रायरेड्डी यांनी स्वतः भेट देऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे
आगामी सात दिवसात कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.मललेश चौगुले,गजू धरनायक, सिद्राय मैत्री, सागर चौगुले अन्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.