सांबरा विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेल्या टर्मिनल बिल्डिंगचे उदघाटन गुरुवारी १४ सप्टेंबर ला होणार आहे. केंद्रीय विमानोड्डाण मंत्री पी अशोक गजपती राजू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सांबरा येथील बेळगाव विमानतळाची नवी टर्मिनल बिल्डिंग पूर्णपणे सज्ज झाली असून १४ सप्टेंबर ला या इमारतीचे उदघाटन होणार आहे. हुबळी आणि बेळगाव येथील या टर्मिनल इमारती एकाचवेळी उदघाटन करून सुरू केल्या जाणार आहेत.
बेळगाव विमानतळाच्या धावपट्टी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विमाने लावण्यासाठीचे टॅक्सिवे, त्यांना प्रवेश करण्याचे मार्ग आणि इतर ईलेक्टरीकल कामे पूर्ण झाली आहेत