कदंब बस आणि वॅनची टक्कर झाल्याने झालेल्या अपघातात तीन जण घटनास्थळीच ठार तर दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे.
खानापूर जवळील अकराळी गावाजवळ बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. कदंब बस आणि वन मध्ये टक्कर झाल्याने अपघात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश शशी देसाई 26,शहानुर इस्माईल उमरखाजी 23,केशव नागराज पुटटस्वामी 25 अशी अपघातातील मयतांची नाव आहेत. हे सर्व रामनगरचे रहिवाशी असून ते व्हॅन मधून गोव्या कडे जात होते.
खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे