अंकिता सुनील कनोजीया वय22, ही युवती मुंबईत नोकरी करत होती.मूळची नागपूरची.वडील नागपूरला एएस आय म्हून सेवा बजावतात.नागपूरहून अंकिताचे दोन मित्र मुंबईला आले होते.त्यावेळी त्या दोन मित्रांनी तिच्यावर दि 4 रोजी बलात्कार करून तिची हत्या केली.नंतर मृतदेह मोठ्या बॅगेत घालून ते दोघे गोव्याला फिरायला गेले.जाताना बेळगाव जवळ गाडी थांबवून ड्रायव्हर झोपला,त्यावेळी दोघांनी मृतदेह घातलेली बॅग काकती जवळील राणी चन्नमा युनिव्हर्सिटी जवळील सर्व्हिस रोड शेजारी असणाऱ्या पाण्याच्या चेंबरमध्ये बॅग टाकली.नंतर ते गोव्याला गेले.गोव्याला गेल्यावर ड्रायव्हरला बॅग गाडीत नाही हे ध्यानात आले.,ड्रायव्हरने त्या दोघांना बॅगबद्दल विचारले असता त्यांनी तरुणीची हत्या केल्याचे सांगितले.नंतर ड्रायव्हरने त्यांना तुम्ही चुकीचे कृत्य केले आहे असे सांगितले आणि त्यांना पोलिस स्थानकात हजर होण्यास सांगितले.ड्रायव्हरने त्यांना जाताना रत्नागिरी पोलीस स्थानकात हजर केले.त्यानुसार रत्नागिरी पोलीस बेळगावात आज आले आणि त्यांनी मृतदेह टाकलेल्या स्थळाला भेट दिली.मुलीचे पालक बेळगावला येण्यासाठी निघाले असून ते आल्यावर बॅग काढून पुढील कार्यवाही केली जाणार आहे
नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या, मृतदेह बेळगावात आणि आरोपींना अटक रत्नागिरीत असं काहीसं गुंतागुंतीचं प्रकरण उघड झालं आहे.
नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या, मृतदेह बेळगावात आणि आरोपींना अटक रत्नागिरीत असं काहीसं गुंतागुंतीचं प्रकरण उघड झालं आहे.
ठाण्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची तिच्याच बालमित्रांकडून हत्या झाली आहे. ही तरुणी मूळची नागपूरची होती. तिच्या दोन बालमित्रांनी तिला अंबरनाथमध्ये पार्टीला बोलवलं होतं. तिथेच त्यांनी तरुणीची हत्या केली.
हत्येनंतर आरोपींनी तिसऱ्या एका मित्राला पार्टीसाठी म्हणून बोलवून घेतलं. तिथे त्यांनी आपण फिरायला जाऊ असं त्या मित्राला सांगितलं. मात्र त्यांना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती.
तिथून ते तिघे मुलीचा मृतदेह घेऊन कर्नाटकातील बेळगावकडे गेले. त्यांनी बेळगाव काकती जवळ तो मृतदेह फेकून दिला. मात्र तोपर्यंत तिसऱ्या मित्राला यातील काहीही माहित नव्हतं.
पण मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तिसऱ्या मित्राला याची कुणकुण लागली. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.
हे तीनही तरुण रत्नागिरीमार्गे ठाण्याला येत असताना, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
संबंधित तरुणीने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. अवघ्या 20 ते 25 दिवसांपूर्वी ती नोकरीनिमित्त ठाण्यात आली होती. ती एका खासगी वसतीगृहात राहात होती. गेल्या दोन दिवसांपासून तिचे कुटुंबीय तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही केल्या संपर्क होत नव्हता.
मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी कनोजिया कुटुंबियांना फोन करुन तिची हत्या झाल्याचं सांगितलं.