विषय आहे मोदींच्या कॅबिनेट विस्ताराचा, याबाबत मोदी आणि अमित शाह यांच्यावर देश पातळीवर किती आरोप किंवा टीका झाल्या हे माहीत नाही. त्यांनी बेळगावच्या बिनकामाच्या खासदार अंगडींना मंत्रिपद दिले नाही याचे समाधान आहे, जर ते त्यांनी दिले असते तर मोदी बेळगावात टीकेचे धनी झाले असते, नाकर्त्या अंगडींना मंत्री केले नाही हे अंगडींच्या नाकर्ते पणाचे यश आणि मोदी किंवा त्यांचे सल्लागार अमित शाह यांच्या मुत्सद्दी पणाचे यश म्हणता येईल.
अंगडी हे नाव किंवा आडनाव प्रमाणे व्यापारी. जातीने लिंगायत पैकी बणजग्या, ते खासदारकीची हॅट्ट्रिक करतात हे भाजपचे यश, त्यांचे स्वतःचे केवळ नशीब. या फॅक्टर वर ते तीनवेळा खासदार झाले बाकी बाकी मात्र शून्य, कारण तीनवेळा खासदार होऊन आपली सिमेंट ची एजन्सी वाढवण्या पलीकडे त्यांची मजल नाही. कमांडो ट्रेनिंग आणि फायरिंग रेंज मधील वादग्रस्त जागेत स्वतःची शिक्षण संस्था उभारली हे एकच ऑफबीट काम, ना हिंदुत्व, ना कुठल्या कार्यकर्त्यांचे भले अंगडींच्या हातानं काहीच भलं झालं नाही.
मागील काही महिने त्यांनी मंत्री पदाचे दिवास्वप्न पाहिले, ते यशस्वी होणारच नव्हते, कारण अंगडी यांच्या खात्यावर भरीव असे काही नाही. स्पष्टपणे भ्रष्टाचार नाही आणि चारित्र्य शुद्ध या जमेच्या बाजू सोडल्या तर बाकी शून्य, मंत्र्याला शोभेल असे व्यक्तिमत्वही नाही आणि काहीच असे नाही ज्याची नोंद होईल. अशा अंगडींना मोदी मंत्रिपद देतील तरी कसे?
असो बेळगावला बी शंकरानंद यांच्या नंतर एकही केंद्रीय मंत्रिपद नाही ही दुर्दैवी गोष्ट. भाजपचे कोरे कधी स्वतःच्या जीवावर निवडून येत नाहीत आणि अंगडी लाटेवर निवडून आले तरी प्रभाव नाही हेच चित्र, दुर्दैव बेळगावकरांचे. लिंगायत म्हणून नोंद घ्यावी तर तेही नाही मठाधिशांच्या नावे यांची विधाने डेंजरच! आता अंगडी कधी मंत्री होतील हेच माहीत नाही.