गेले दोन दिवस पाऊस कमी असल्याने शहर आणि उपनगरात गणेश मूर्ती आणि हालते देखावे पहाण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे मात्र देखावे पहाटे पर्यंत सुरू करण्याच आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल असताना खडे बाजार ए सी पी जयकुमार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटी करून देखावे बंद करण्यास भाग पाडले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता टिळकवाडी शुक्रवार पेठ गणेश उत्सव मंडळाचा तर शनिवारी मध्यरात्री एस पी एम रोड मंडळाचा देखावा दमदाटी करून बंद पाडला आहे.
आगामी दोन शेवटचे दोन दिवस रात्रभर हालते देखावे सुरू करा आणि ए सी पी जयकुमाराना आवरा यासाठी महा मंडळ संपर्क प्रमुख विकास कलघटगी,कार्याध्यक्ष गणेश दड्डीकर,एस पी एम रोड मंडळाचे अध्यक्ष परशराम शहापुरकर आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन रविवार आणि सोमवार दोन दिवस पहाटे पर्यंत देखावे सुरू ठेवण्याची मागणी केली.यावर पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी आपण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की दोन दिवस मुक्त पणे शांततेत देखावे पहाटे पर्यंत पहाव असे सांगितले.