मिसेस इंडिया युके स्पर्धेच्या २० सौन्दर्यवान महिलांच्या यादीत बेळगावची कन्या प्रज्ञा पुणेकर यांनी प्रवेश घेतला आहे. ही स्पर्धा युके स्थित भारतीय महिलांची हुशारी, प्रसंगावधान, नीतिमत्ता आणि सौन्दर्य यांचे परीक्षण करून विवाहित महिलांना जगण्याची नवी प्रेरणा देते.
अंतिम यादीतील विजेत्या महिलेस मिसेस इंडिया युके ‘किताब देऊन पुरस्कारित केले जाणार आहे. लंडन येथील मरीऍट हॉटेल मध्ये २३ सप्टेंबर ला मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१७ किताब बरोबरच यापैकी विजेतील पुरस्कार वितरण होईल.
एच आर विषयातून पदवित्तर एमबीए पर्यंतचे शिक्षण प्रज्ञा यांनी घेतले आहे. त्यांना प्रवास, संगीत आणि वाचनाची आवड आहे