माहेश्वरी अंध शाळेतील मुलांना मोदक आणिबकरी ईद ची खीर भोजन देत एक वेगळ्या प्रकारे बकरी ईद साजरी करून एक वेगळा सामाजिक संदेश मुस्लिम युवकांनी दिला आहे.या कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व धर्मीय समाजसेवकांनी उपस्थिती लावून एकतेचा देखील संदेश पोचवला आहे.
भाजी मार्केट येथील व्यापारी अख्तर सनदी,अस्लम सनदी सामाजिक कार्यकर्ते साजिद सय्यद,दादापीर सनदी,अन्वर मुल्ला या कार्यकर्त्यांनी बकरी ईद च निमित्य साधून अंध मुलांना अन्नदान करून ईद साजरी केली आहे.ए सी पी शंकर मारिहाळ,सी पी आय जे एम कालिमिर्ची,सी पी आय जावेद मुशाफिरी ,सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळंगुंद, नारायण सावंत,संतोष कांबळे,संतोष जंतीकट्टी,सुनील जाधव,संतोष झवरे,विकास कलघटगी आदी यावेळी उपस्थित होते.
कालिमिर्ची मुशाफिरी यांनी आदर्श घालून दिला-मारिहाळ
बेळगाव सारख्या संवेदनशील शहरात ए पी एम सी पोलीस निरीक्षक जे एम कालीमरची,शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यानी मुस्लिम धर्मीय असून देखील स्वतः गणपती पूजा करत आरतीत सहभाग दर्शवून समाजा समोर जे सौहार्दतेच उदाहरण सादर केलं आहे याचा आदर्श पूर्ण राज्याने घ्यावा अस मत मार्केट ए सी पी शंकर मारिहाळ यांनी व्यक्त केलं.