गणेशोत्सव निरोपाच्या मिरवणुकीला डॉल्बी लावण्यास प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. २ बेस, २ टॉप आणि ध्वनीमर्यादा ७५ डेसीबल असावे याची काळजी घ्यावी अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी यात मोठी भूमिका निभावली आहे.
इलेकट्रीकल आणि साऊंड सिस्टिम कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला ही परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक काळात जर १४४ कलम लागू झाले तर ही परवानगी रद्दबातल होणार आहे.
लोकांना त्रास होईल असा आवाज नको, मध्यपान व धूम्रपान करीत सामील होऊ नये, डॉल्बी वर कोणत्याही धर्माला मारक ठरेल अशे वक्त्यव्य किंवा कार्यक्रम नको अशा अनेक अटी घालण्यात आला आहेत.
महामंडळ पीओपी आणि डॉल्बी च्या विरोधात आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपण्यासाठी समनवय साधून विकास कलघटगी यांनी पुढाकार घेतला आहे. कोणतेही चुकीचे काम करून या अटींना बाधा पोहचेल असे कृत्य करू नका असे आवाहन करण्यात आले आहे