Friday, January 10, 2025

/

सेव्हन कन्स्ट्रक्शनच्या अपार्टमेंटचा होणार सर्व्हे

 belgaum

आमदार मालकीच्या कन्स्ट्रक्शन कम्पनीने  नाल्याची दिशा बदलून जाधवनगर मध्ये अपार्टमेंट्स उभारलेल्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार आहे. या संबंधी भु मापन कार्यालयाने बेळगाव बुडा, महा पालिका आणि तालुका भु मापन कार्यालयास नोटीस बजावली आहे.

NOtice

भु मापन कार्यालयाने बजावलेल्या नोटिशीस  वरील तिन्ही कार्यालयांना 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व कागडपत्रा सह जाधव नगर सर्व्हे नंम्बर 4861/१/n  अतिक्रमित नाल्या जवळ हजर रहावे असे सूचित करण्यात आले आहे.  यावेळी संपूर्ण नाल्याच मोजमाप करून सर्व्हे केला जाणार आहे आणि त्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल दिला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी  युथ फौंडेशन चे अध्यक्ष आर टी आय कार्यकर्ता श्रीनिवास राव यांनी हे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले होते .  मुख्यमंत्र्यकडे नाला अतिक्रमण करून अपार्टमेंट बांधले असल्याची  तक्रार केली होती त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याना दिले होते  जिल्हाधिकाऱ्याने हे प्रकरण भूमापन कार्यालया कडे वर्ग करून रिपोर्ट देण्याची सूचना केली होती त्यानुसार या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

गेल्या 29 जून रोजी बेळगाव live ने पुराव्या सह नाला वळवून कस अपार्टमेंट उभारलय याचे पुरावे दिले होते ते पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

नाला वळवून कस उभारलं अपार्टमेंट- बघा बेळगाव live कडचे पुरावे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.