मंगळवारी शहरात झालेल्या दोन कार्यक्रमात पाणी बचाव अभियान च्या कार्यकर्त्या आरती भंडारे यांनी मार्गदर्शन केले.
कंग्राळ गल्ली येथील कार्यक्रमात पाणी अडवून जिरवण्याचे पायाभूत तंत्र तर आविष्कार तर्फे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात पाणी वाचविण्याच्या यंत्रांची माहिती त्यांनी महिलांना दिली.
पाणी पाऊस पडताना वाचवा, पाऊस नसताना वाचवा, थंडीत आणि उष्णतेत वाचवा, सवयी बदला अन्यथा पाण्यासाठी मैलोनमैल वणवण करा, असे त्यांनी सांगितले. आणखी एका कार्यक्रमात पाणी बचत यंत्र नळ आणि टाकी ला बसवा अस आवाहन त्यांनी केलं.यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्याने पाणी बचती कडे लक्ष देणे गरजेचे असून दैनंदिन जीवनात भंडारे यांच्या टिप्स खूप महत्वाच्या ठरणार आहेत.
पाणी बचतीच्या टिप्स ऐकण्यासाठी करा खालील लिंक क्लिक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10212343818845067&id=1067539530