Thursday, May 2, 2024

/

आरपीडीयन्स डे च्या निमित्ताने माजी विध्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

 belgaum

प्रत्येकाच्या मनात आपापल्या कॉलेजच्या आठवणी दडलेल्या असतात अश्याच कॉलेजच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला निमित्य होत आर पी डी कॉलेजच्या माजी विध्यार्थी संघटनेनं आयोजित केलेल्या आर पी डी यन्स डेच…
दरवर्षी आगष्ट महिन्यातील पहिल्या रविवारी आर पी डी कॉलेजच्या संस्थापिका राणी पार्वती देवी यांचा स्मृती दिन आणि आर पी डी यन्स डे साजरा केला जातो. 80 वर्षाच्या वयस्करा पासून 2017 विध्यार्थ्यानी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता.
आर पी डी कॉलेज मध्ये शिकलेले अनेक विध्यार्थी देशभरात मोठ्यां उंचीवर पोचली आहेत याचा आम्हाला भरपूर आनंद होतो आहे आपणही ज्या स्थानावर आहोत ते केवळ या कॉलेज मुळेच असे मत गोवा येथील एम ई एस कॉलेज चे प्राचार्य डॉ एम एस कामत यांनी काढले . यावेळी कामत यांचा सत्कार  माजी विद्यार्थी या नात्याने सत्कार करण्यात आला. गोवा मुक्ती स्वातंत्र्य आंदोलनात आर पी डी माजी विधयार्थ्यांचा सहभाग त्यांनी यावेळी अधोरेखित केला.


यावेळी व्यासपीठावर आर सी यु इंग्लिश विभाग प्रमुख डॉ विजय नागन्नावर,आर पी डी प्राचार्य ए ए देसाई,प्रा जी एन शाली, एस के इ चे  एस व्ही शानभाग,प्रा प्रसन्न जोशी ,माजी विधयार्थी संघटनेचे विनायक जाधव उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत आर पी डी माजी विधयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यात कॉम्रेड कृष्णा मेणसे, अड अशोक पोतदार, अड नागेश सातेरी, अड मारुती कामाणाचे,अड शामसुंदर पत्तार, पत्रकार प्रकाश बेळगोजी,प्रा सुरेबाणकर आदी सामील आहेत.सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सुरुवातीला प्राचार्य ए ए देसाई यांनी सर्व उपस्थित आजी माजी विधर्थ्याना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला ज्ञानेशवरी कुंभार आणि ग्रुप ने शारदावत्सन केलं प्रा अर्पणा पाटील प्रा विजयकुमार पाटील यांनी सूत्रसंचालन तर प्रा राजेंद्र पोवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रा प्रसन्न जोशी यांनी प्रास्तविक केलं

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.