स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घुमला’बेळगांव महाराष्ट्राचे’ चा गजर घुमला आहे निमित्य होते श्री राम सेनेच्या अखंड हिंदुस्तान कार्यक्रमात…बेळगावात दर वर्षी 14 ऑगष्ट च्या रात्री म्हणजे ठीक मध्यरात्री 12 वाजता 15 ऑगस्ट रोजी श्रीराम सेने तर्फे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या वर्षी टिळक चौकात या कार्यक्रमाचं आयोजन केले गेले होते.
नेहमी कार्यक्रमाला बेळगावातील तरुणाईची उपस्थिती लक्षणीय असते. बेळगांव श्रीराम सेनेत बहुसंख्य कार्यकर्ते मराठी भाषिक आहेत. विचारसरणी जरी हिंदुत्ववादी असली तरी त्यांची नाळ मराठीशी जोडलेली असल्यामुळे त्यांच्यातल ‘मराठी’ पण कधी कधी उफाळुन येत असते त्याचा प्रत्यय यावेळीच्या कार्यक्रमातआला.
यावेळच्या प्रमुख वक्त्या म्हणून पुण्याच्या रसिका ताई उपस्थित होत्या. आणि इथल्या मराठी वातावरणामुळे त्या भारावून गेल्या होत्या आणि भाषणाच्या ओघात त्या बोलून गेल्या “बेळगांव महाराष्ट्राचेच”. त्याच्या तोंडून हे बाहेर पडताच उपस्थित मराठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे “झालाच पाहिजे” च्या घोषणा दिल्या आणि सर्वार्थाने सामान्य जनतेच्या महाराष्ट्रात जाण्याच्या भावना इथं व्यक्त झाल्या.
बेळगावात मराठी अस्मितेची नाळ आहे हे पून्हा एकदा या घटनेने सिद्ध झालं असून हिंदुत्ववादी असलेल्या मराठी नेत्यांना कधी समजणार हाच महत्वाचा प्रश्न आहे.
नेमकं काय म्हणाली पुणे येथील रसिका ऐका क्लिक करा खालील लिंक