Friday, April 26, 2024

/

जवानांची दही हंडी अन लेझीम मल्लखांबचा उत्साह

 belgaum

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गोकुळ अष्टमीनिमित्त दही हंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . शिवाजी स्टेडियमवर आयोजित दही हंडी कार्यक्रमाच्यावेळी जवानांनी लेझीम आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली

MLirc dahi handi

प्रारंभी मराठा सेंटरचे ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते दही हंडीचे पूजन करण्यात आले . त्यानंतर लेझीमची प्रात्यक्षिके जवानांनी सादर केली . लेझीम नंतर मल्लखांबाची प्रात्यक्षिके जवानांनी सादर करून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले .

 belgaum

दही हंडी स्पर्धेत ट्रेनिंग ,रेकॉर्ड आणि ऍडम बटालियन या तीन संघानी भाग घेतला होता . पहिल्या फेरीत तिन्ही संघानी आपली ताकद अजमावून उंचीचा अंदाज घेतला . शेवटी ट्रेनिंग संघाच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली . दही हंडी फोडल्यावर ट्रेनिंग बटालियनच्या जवान अधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला .

दही हंडी स्पर्धा पाहण्यासाठी लष्करी अधिकारी ,शहरातील मान्यवर निमंत्रित ,जवान आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .

व्हिडियो पहाण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.