रक्षा बंधन हे भाऊ बहिणीचे अतूट नाते सांगणारा सण आहे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानाना राखी बांधून त्यांच्यादीर्घायुष्य साठी प्रार्थना बेळगाव येथील मराठा इंफट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये करण्यात आली . चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील यशवन्तराव चव्हाण कॉलेज तसच के एल एस शाळेच्या चिमुकल्या विध्यार्थिनीनी जवानांना राखी बांधून हा सण साजरा केला.आपले घर दार सोडून देश सेवा करण्यासाठी सीमेवर वाहून घेतलेय जवानांना गेल्या अनेक वर्षा पासून चंदगड तालुक्यातील हलकर्णी महाविध्यालायाच्या विध्यार्थिनी आणि बेळगावातील के एल एस शाळेच्या चिमुकल्या विध्यार्थिनी राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्य साठी प्रार्थना केली या वर्षी सुद्धा त्यांनी बेळगाव मराठा मराठा सेन्टरच्या जवानांना राखी बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
यावेळी मराठा सेंटर चे कॅप्टन रॉबिन इब्राहिम ,सुभेदार मेजर उत्तम शिंदे, सुभेदार मेजर सुनील शिंदे यांच्यासह अन्य प्रशिक्षित जवान, मराठा सेंटर अधिकारी उपस्थित होते.मराठा सेन्टरच्या क्वाटर गार्ड मध्ये आयोजित सेनेच्या जवानाना राखी बंधन केल्या नंतर जवानांनी सुद्धा देश आणि मात बहिणीचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध असल्याची भावना बोलावून दाखविली आहे . जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तान कडून निरंतर होणार्या गोळीबार नंतर जवानांना आपल्या घरातील मंडळीची कमतरता होवू नये या साठीचा हे रक्षा बंधन कार्यक्रम जवानांना प्रोत्साहन देणारा आहे . देशाच्या रक्षणा साठी सज्ज असलेल्या या जवानांना राखी बांधण्याच्या उपक्रम म्हणजे जवानाना देश रक्षणा साठी आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे .