पत्रकार विकास अकादमीने बेळगावातील प्रेस फोटोग्राफर साठी राबविलेल्या प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य आहे, हे प्रदर्शन उत्कृष्ट आहे असे गौरव उदगार महापौर संजोत बांदेकर यांनी काढले.
अकादमीच्या प्रदर्शनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. डीसीपी सीमा लाटकर यांच्या हस्ते कॅमेऱ्याची क्लीक करूनही उदघाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुभाष धुमे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
व्यासपीठावर प्रायोजक रोटरी वेणूग्रामचे मनोहर वाटवे, आयोजन प्रमुख डी बी पाटील, प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष जगदीश दड्डीकर, अकादमीचे माजी अध्यक्ष नेताजी जाधव आणि ज्येष्ठ फोटोग्राफर अन्वर बेग होते.
चिटणीस प्रसाद प्रभू यांनी स्वागत केले, अध्यक्ष धुमे यांनी प्रास्ताविक केले, यानंतर फोटोग्राफर चा सन्मान झाला. डीसीपी सीमा लाटकर यांनी आपणास ही फोटोग्राफीची आवड आहे असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले.
डी बी पाटील यांनी आभार मानले.