Tuesday, April 30, 2024

/

गणराय आले-अनगोळ खास आकर्षण रघुनाथ पेठेचा राजा

 belgaum

Raghunath pethसन. 1965 साली हे मंडळ स्थापन करण्यात आले. रघुनाथ पेठ येथे तेली बंधु यांनी स्वताच्या मुलांसाठी, आणि गल्लीतील युवकांच्या साठी स्वखर्चाने एक तालीम बांधून घेतली आणि युवकांना कुस्तीसाठी प्रोत्साहन दिले. आणि उत्कृष्ट पैलवान तयार केले. आणि या युवकांच्या माध्यमातून एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा विचार आला. आणि पहिला गणपती हा याच तेली बंधु च्या तालमीत स्थापन केला गेला. आणि या वेळी तेली बंधु रामा सोमणाचे, बाबुराव कंग्राळकर बंधु, नारायण बाबले, परशराम चौगुले, ईश्वर बिर्जे, बाबु बिर्जे, यल्लापा नलवडे, मुतगेकर बंधु नारायण बाबले (गवळी).रामा यळ्ळूरकर, बाबुराव पाटील यांनी पहिला गणेश उत्सव साजरा केला. आणि हे संस्थापक सदस्य आहेत. दरवर्षी उत्सव साजरा करत असताना गल्लीतील युवकांनी एकत्र येऊन हा उत्सव सार्वजनिक केला.

 

हा उत्सव साजरा करताना मंडप घालणे पडदे रंगवणे आणि इतर कामे कार्यकर्ते स्वतःच करत. मोनाप्पा चौगुले हे स्वतः पडदा रंगवून मंडपात देखावा करण्यात येत असे. या मंडळात इतर मुस्लिम बांधव सुध्दा सहभागी असत. जहागीरदार बंधु शेख बंधु हेसुद्धा या मंडळाचे सदस्य होते. लियाकत जहागीरदार, शकत जहागीरदार हे मंडळाचे पहीले सरचिटणीस. तर रामा सोमणाचे नारायण गवळी, नारायण बाबले, हे पदाधिकारी होते. नारायण बाबले हे मंडळाचे पहिले खजिनदार. यावेळी मंडळाचे नावे एक साप्ताहिक वार्षिक फंड ही सुरू करण्यात आला. आणि याच्या माध्यमातून उत्सव साजरा केला जात असे. उत्सव दरम्यान गल्लीत लेझीम मेळा आयोजित करण्यात येत असे. महत्त्वाचे म्हणजे हा लेझीम डफकी वर न खेळता पावा (बासरी) वर खेळला जात असे.. आणि लेझीम सोबत घागर फुकली जात असे. आणि या मेळ्यात बाबले गल्ली, रघुनाथ पेठ येथील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होत. आणि पेठेचा लेझीम मेळा हा नावाजलेला मेळा म्हणून नावारूपाला आला. यानंतर नवीन कार्यकारिणी सदस्य निवडण्यात आली. आणि या वेळी नारायण बिर्जे, निंगाप्पा गौंडाडकर, शामराव देमजी, नारायण हेब्बाळकर, लक्ष्मण यळ्ळूरकर, कृष्णा सायनाक. आदी कार्यकर्ते तयार झाले आणि यानी मंडळाची धुरा सांभाळली. याच वेळी नाटकाचे प्रयोग पण सादर केले जात असे. मंडळाच्या नावे नाटक कंपनी सुद्धा होती. आणि वेगवेगळ्या पौराणिक कथा वर नाटके आयोजित करण्यात येत असत.. यानंतर काही वर्षांनंतर पुन्हा नवनवीन कार्यकर्ते मंडळाच्या जबाबदारी घेत सार्वजनिक उत्सव साजरा केला. आणि यातून शिवनेरी युवक मंडळाची स्थापना करण्यात आली. आणि युवकांच्या खांद्यावर सार्वजनिक कामाची धुरा सांभाळली. आणि नवनवीन प्रयोग करून पाहिला आणि सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला. आणि या युवकांच्या माध्यमातून एकत्र येऊन गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला. यावेळी मंडळाच्या वतीने झांज पथक तयार करण्यात आले. नंतर गणेश उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठ मोठे देखाव्यांचे सादरीकरण केले. या मध्ये पहिल्यांदा मोठा देखावा करण्यात आला तो म्हणजे गोकाक मधील सुप्रसिद्ध झुलता पुलाची प्रतिकृती सादर करण्यात आली. आणि या देखाव्यांचे सर्वत्र कौतुक केले. आणि अनगोळ चे नाव दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यात मंडळचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. आणि सर्व गणेश भक्तांचे पाय अनगोळ भागाकडे वळत होते. आणि या यशा नंतर भव्य आणि ऐतिहासिक टायटॅनिक चित्रपटवर आधारित टायटॅनिक बोट हा देखावा सादर करण्यात आला. आणि हा देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील गणेश भक्तांचा महापूर संपूर्ण अनगोळ परीसर रात्र भर ओसंडून वाहत होता. आणि अनगोळ गावाचे नाव सर्वत्र पसरले ते याच मंडळाच्या कार्यामुळे.. आणि नंतरच्या काळात वृंदावन उद्यान, राम सेतू, साईबाबा हालताना देखावा तोरणा किल्ल्याची झुंजार मनाची, शेतकरी आत्महत्या वर देखावा, असे अनेक देखाव्यांचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या वर्षी प्रथमच भव्य दिव्य असा सर्जीकल स्ट्राईक देखावा करण्यात येणार आहे. हा जिवंत देखावा करण्यात येणार आहे. हा देखावा युवकांच्या माध्यमातून एकत्र येऊन करण्यात येणार आहे. यासाठी भव्य हेलिकॉप्टर, पठाणकोट वर आतंकवादी हल्ला. आणि नंतर सर्जीकल स्ट्राईक मध्ये आतंकवादी छावण्यावर भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्याचा देखावा करण्यात येणार आहे…
आतापर्यंत शिवाजी मुतगेकर, दिगंबर शहापूर, शंकर बिर्जे, राजु मुतगेकर, बाळू बिर्जे, , यानी आतापर्यंत अध्यक्ष पद भूषविले. तर आता सदानंद यळ्ळूरकर हे अध्यक्षस्थानी आहे.
मंडळाच्या व्यायाम शाळेतुन होतकरू शरीरसौष्ठवपटू तयार होत आहेत, अनगोळ हनुमान श्री शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये शरद व्यायाम शाळेच्या युवकांनी दबदबा निर्माण केला आहे. पहिल्या 10 मध्ये 5/6 युवक याच व्यायाम शाळेतील आहेत तर सलग दोन वर्षे अनगोळ श्री यशवंत मुचंडी, सचिन मांगले, यानी फटका. तर इतर खेळाडू पहिल्या पाच मध्ये आहेत.. खुल्या गटात ही यांचा दबदबा निर्माण केला आहे…
हनुमान जयंती, शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिवजयंती उत्सव सजिव देखाव्यांचे आयोजन हे या मंडळाची खासीयत आहे.. मध्यवर्ती अनगोळ साठी सतत यांचे योगदान महत्त्वाचे आहे..
युवकांच्या साठी लाठी मेळा लेझीम मेळा सुरू केले. आणि या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.. आरोग्य शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप. अनाथ अश्रमात धान्य वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात…
यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्त नगरसेवक विनायक गुंजटकर यानी आपल्या भागातील एक छान सुंदर भव्य दिव्य असे सिध्दीविनायक मंदिर ची प्रतिकृती तयार करून दिले आहे यंदाच्या वर्षी पासुन एकाच पद्धतीची बैठी मुर्ती साकारणार आहेत.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.