हिंदू धर्मीय तर गणपती बाप्पाचा आगमन सोहळा गणेश उत्सव भक्ती भावाने साजरा करतातच पण पोलीस खात्यात सेवा बजावणाऱ्या एका मुस्लिम अधिकाऱ्याने सेवा बजावत असलेल्या पोलीस स्थानकात श्री मूर्ती आणण्या पासून प्रति स्थापणा करे पर्यंत स्वतः पुढाकार घेतात ए पी एम सी पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे एम कालीमिरची यांनी आपल्या कर्तृत्वाने सगळ्या समोरच एक वेगळा आदर्श निर्माण केलाय
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गांधी टोपी परिधान करून कपाळावर कुंमकूम टिळक लाऊन घेऊन स्वतः श्री मूर्ती आणली नंतर मूर्तीची प्रति स्थापना ए पी एम सी पोलीस स्थानकात केली.दरवर्षी ज्या पोलीस स्थानकात जे एम कालीमिरची सेवा बजावतात तेथे गणेश मूर्ती आणण्यापासून प्रतिस्थापणा करे पर्यंत ची सर्व जबाबदारी भक्ती भावाने पार पाडतात.पोलीस स्थानकातील सर्व स्टाफ मध्ये एकतेची भावना जागृत होण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
जातीय सलोख्याचे उदाहरण किंवा राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण याहून वेगळे काय असणार?