पिरनवाडी गावचे सुपुत्र, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि सामाजिक कामात नेहमीच आघाडीवर असलेले व्यक्तिमत्व म्हणून सचिन गोरले ओळखले जातात. बेळगाव live ने म्हणूनच त्यांना बनवले आहे आठवड्याचे व्यक्तिमत्व.
ग्रीन ग्लोबल इंडिया च्या माध्यमातून गोरले कार्यरत आहेत. या संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष आहेत.त्यांनी या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणाचे भरीव कार्य सुरू केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांचा अनेक ठिकाणी गौरव झालाय.आजच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना असे काम हाती घेऊन त्यांनी केलेला प्रयत्न गौरवास पात्र आहे.
गोरले यांनी वाघवडे परिसरातील युवकांना एकत्र करून शिवसेना शाखा सुरू केली. या भागातील ३५०० हुन अधिक लोकांना डेंग्यूची लस देणे, आरोग्य शिबीर भरविणे,छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणे, शिवरायांचा जन्म सोहळा करून युवकांमध्ये शिवप्रेमाची ज्योत चेतवणे अशी कामे गोरले यांनी केली आहेत.
मच्छे, बीजगरणी या गावांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा मोठा विस्तार केला आहे.
भविष्यात बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणे आणि व्यसनमुक्त पिढी तयार करणे या स्वप्नासाठी झगडत राहणार आहे असे त्यांनी सांगितले.