Friday, April 19, 2024

/

बेळगाव कोकणाच नात पिता पुत्रानी जपलं

 belgaum

RAne son fatherबेळगाव प्रश्नी पिता पुत्र आक्रमक

बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टात केंद्राच्या वकिलाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याचे पडसाद महाराष्ट्र विधी मंडळात उमटले खरे..मात्र यात कॉंग्रेस चे आमदार पिता पुत्रांनी पुन्हा एकदा बेळगाव प्रश्न उपस्थित करून कोकण आणि बेळगावच नात घट्ट आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिल आहे .

नितेश राणे यांनी मराठी मुद्द्यावर निवडणून आलेल्या शिवसेना आणि राज्य सरकारला धारेवर धरल तर माजी मंत्री नारायण राणे यांनी परिषदेत या विषयावर विशेष चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. सीमा प्रश्नी केंद्रात कर्नाटकाच्या  २८ खासदारा समोर महाराष्ट्राचे ४८ खासदार कमी पडल्याचे निदर्शनास आल्या नंतर सगळीकडून हळू हळू महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारावर दबाव वाढू लागला आहे .त्यातच महाराष्ट्र विधान भवनात हा मुद्दा उपस्थित झाल्याने पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आहे .

 belgaum

नेमकं काय म्हणाले राणे

बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय ?
नितेश राणे

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमावादात न्यायालयात कर्नाटकचे मंत्री वकिल्यांच्या फौजांसह हजर राहतात. मात्र,आपले सरकारकडून ज्यूनियर वकिलाला न्यायालयात पाठवतात. मग आपल्या सरकारने  बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय ? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विचारला. औचित्याच्या मुद्द्यावर बेळगाव प्रश्नाकडे लक्षवेधत आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

नितेश राणे म्हणाले, ” बेळगावप्रश्नी सिमावादाच्या खटल्यामध्ये राज्य सराकारने कायद्यातील निष्णात वकिल नेमण्याऐवजी साधा वकिल नेमला आहे. कर्नाटक सरकारने वकिलांची फौज नेमली आहे. स्वता कर्नाटकचे मंत्री खटल्यावेळी न्यायालयात उपस्थित असतात. मात्र आपले सरकार ज्यूनियर वकिलाला न्यायालयात पाठवतात. मग आपल्या सरकारने  बेळगाव कर्नाटकला द्यायचं ठरवलयं काय ? शिवसेनेचे खासदार केंद्रात या प्रश्नी गप्पं बसले आहेत, आणि इथेही हे ( शिवेसेना ) गप्पं बसले आहेत.”

त्यामुळे सरकारने या प्रश्नी निवेदन करावे. यावेळी नितेश राणे यांच्या मुद्दयाला साथ देत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ” हा गंभिर प्रश्न आहे. प्रत्येकवेळेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणात बेळगाव प्रश्नावर दिलासा देण्याचा उल्लेख करत असतो. आमच्या सरकारने विशेष प्रयत्न केले होते. न्यायप्रविष्ट प्रकरण आहे हे मान्य आहे, पण कर्नाटक सरकार गांभिर्याने कार्यवाही करत असताना आपलं सरकार निष्काळजीपणा का दाखवला असा प्रश्न पाटील यांना विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.