केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची कर्नाटक निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.पुढील वर्षी कर्नाटकात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर निवडणूक प्रभारी केल्याची घोषणा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे.गुजरात निवडणुकीचा प्रभार अरुण जेटली यांच्याकडे देण्यात आला आहे.
पुढील वर्षीच्या निवडणुका भाजपला कोणत्याही स्थितीत जिंकायच्या आहेत त्यामुळं भाजप ने दोन्ही वरीष्ठ केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक प्रभार पद देण्यात आले आहे.
प्रकाश जावडेकर महाराष्ट्र भाजप चे जेष्ठ नेते आणि संघाचे आहेत.जावडेकर यांची नियुक्ती झाल्याने बेळगावातील भाजपच्या मराठी उममेदवाराना तिकीट वाटपात चांगली संधी मिळू शकते